काँग्रेसच्या ‘या’ नेत्याला भाजप माढ्यातून उमेदवारी देणार ?  

0
560

मुंबई, दि. २४ (पीसीबी) – काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर  सोमवारी (दि.२५) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, अशी माहिती त्यांनी स्वतः दिली आहे.  यामुळे राष्ट्रवादीनंतर  आता काँग्रेसलाही मोठे खिंडार पडले आहे.  सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण हे तीन तालुके माढा मतदारसंघात येतात. या भागात रणजितसिंह यांचे  चांगला प्रभाव  असल्याने त्यांना माढ्यातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

निंबाळकरांना भाजपाकडून माढ्यातून उमेदवारी मिळण्याची शक्यता  आहे. त्यांची काही दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्त  झाली आहे.  त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे. अंतर्गत कलहामुळे त्यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतल्याचे  सांगितले जात  आहे.

दरम्यान,  परभणीतील राष्ट्रवादीचे माजी खासदार गणेश दुधगावकर यांचे पुत्र समीर दुधगावकर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.  समीर दुधगावकर यांनी   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे.