Maharashtra

काँग्रेसच्या तिकीटावर सलमान खान इंदूरमधून लोकसभा लढवणार ?

By PCB Author

March 10, 2019

मुंबई, दि. १० (पीसीबी) – अभिनेता सलमान खान काँग्रेसच्या तिकीटावर इंदूरमधून लोकसभा लढवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.  लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्याविरोधात सलमान रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

‘रामायण’ मालिकेत प्रभू श्रीरामाची  भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल इंदूरमधून लोकसभा  लढवणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या.  मात्र, आता सलमानचे नाव पुढे आले आहे. याबाबत सलमान खान किंवा काँग्रेसकडून अद्याप कुठलाही अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी यापूर्वी सलमान खानचे नाव सुचवले होते.  नुकतेच त्याला मध्य प्रदेश पर्यटन विभागाचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. सलमानचा जन्म मध्य प्रदेशमध्ये झाला आहे.  त्यामुळे जन्मभूमीत सलमानला जनमत चांगले मिळेल, असा काँग्रेसचा अंदाज आहे.