काँग्रेसचे हिंदू नेते मला प्रचाराला बोलवत नाहीत – गुलाम नबी आझाद

0
346

उत्तरप्रदेश, दि. १९ (पीसीबी) – ‘गेल्या चार वर्षांपासून काँग्रेसमधील हिंदू नेते मला प्रचारासाठी बोलावत नाहीत,’ असे वक्तव्य जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी केले आहे. अलीगड मुस्लिम विद्यापीठात माजी विद्यार्थ्यांच्या एका संमेलनात ते बोलत होते.