काँग्रेसचे माजी नगरसेवक सुरेश दलोड यांच्यावर जीवघेणा हल्ला

0
494

नाशिक, दि. २० (पीसीबी) – नाशिक शहरातील काँग्रेसचे माजी नगरसेवक सुरेश दलोड यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी (दि. १७) रात्रीच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक शहरातील मिरकर कॉम्प्लेक्समध्ये सुरेश दलोड यांचे कार्यालय आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास ते आपल्या कार्यालयात बसले असताना अज्ञात तिघा जणांनी त्यांच्या कार्यालयात प्रवेश केला आणि दलोड यांना मारहाण करायला सुरुवात केली. दरम्यान, त्यांना वाचवण्यासाठी धावलेला त्यांचा मुलगा आणि आत्येभावालाही या तिघांनी बेदम मारहाण केली आणि फरार झाले. पूर्ववैमन्यस्यातून हा हल्ला झाला असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेजही उपलब्ध झाले आहे. नाशिक पोलीस  आरोपींचा शोध घेत आहेत.