“काँग्रेसची सरकारं पाडण्यात पंतप्रधान मोदी व्यस्त आहेत”

0
385

नवी दिल्ली,दि.११(पीसीबी) – काँग्रेसची सरकारं पाडण्यात पंतप्रधान मोदी व्यस्त आहेत, असं वक्तव्य काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलं आहे. त्यांनी या आशयाचं ट्विट करत पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

“लोकांनी निवडून दिलेलं काँग्रेस शासन पाडण्यात आपण व्यस्त आहात परंतू हे सगळं करत असताना आपण नोटीस केलं नसेल कच्च्या तेलाच्या किमती ३५ प्रतिशत कमी झाल्या आहेत” असं राहुल गांधी म्हणाले आहेत.

“तुम्ही ६० रूपये प्रति लिटर पेट्रोल करून त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना देणार आहात का?” असा सवालही राहुल गांधी यांनी आपल्या ट्विट मध्ये केला आहे.