Pimpri

कष्टकऱ्यांना पेन्शन आणि सामाजिक सुरक्षेसाठी आज पासूनच संघर्ष करा – मेधाताई पाटकर .

By PCB Author

January 02, 2024

चिंचवड येथे असंघटित कष्टकरी कामगारांची पेन्शन परिषद.

पिंपरी, दि. १ (पीसीबी) – राज्यातील असंघटित कामगारांची संख्या मोठी आहे, मोठमोठ्या विकासात, इमारतीत ज्यांचे हात लागतात असे श्रमिक हे राष्ट्र आणि राज्य निर्माण करतो मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते उतार वयामध्ये कष्टकरी कामगारांना पेन्शन सह सामाजिक सुरक्षा साठी आज १ तारखेपासून संघर्ष करुन पेन्शन योजना हाती घ्या असा एल्गार जन आंदोलनाच्या राष्ट्रीय नेत्या मेधाताई पाटकर यांनी केले.

कष्टकरी संघर्ष महासंघ, बांधकाम कामगार समिती,महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे आज चिंचवड येथे असंघटित कष्टकरी पेन्शन परिषदेचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी कामगार नेते काशिनाथ नखाते होते. यावेळी राष्ट्रीय किमान वेतन आयोगाचे सदस्य चंदन कुमार, मा. नगरसेवक मारुती भापकर, राष्ट्रीय समन्वयक युवराज गटकळ, प्रसाद बागवे, महिलाअध्यक्ष माधुरीताई जलमुलवार, वैशाली पाटील संघटक अनिल बारावकर, निमंत्रक सिद्धनाथ देशमुख,इरफान चौधरी, राजू पठाण, मनोज यादव,सलीम शेख, नितिन सुरवसे,बालाजी लोखंडे, नितिन सुरवसे,सुनिता पोतदार,अर्चना कांबळे ,विजया पाटील, अनिता वाघ, पंढरीनाथ क्षीरसागर ,शकुंतला सस्ते,अलका पडवल,सलीम डांगे,ओम प्रकाश, परमेश्वर शिंदे,यासीनशेख,निरंजन लोखंडे आदीसह असंघटित कमागर उपस्थित होते.

मेधाताई म्हणाल्या की नवीन वर्षाची सुरुवात आपण परिषदेच्या निमित्ताने संघर्षाला धार देत आहात सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महत्त्वाचे असून रोजगाराच्या केवळ घोषणाच होतात कोट्यवधी लोक न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत, ४४ कामगार कायदे मोडून किरकोळ श्रम संहिता केल्याब याचा सरकारला विचारां विकासाचे केवळ दिव्य स्वप्न दाखवणे, धर्माची वातावरणात आपण सत्याग्रही म्हणून लढत राहू या.

चंदन कुमार म्हणाले की राष्ट्रीय स्तरावरती कामगारांच्या बाजूने अनेक पर्याय आहेत मात्र सरकारची मानसिकता नाही. राजस्थान सरकारने कायदा केला महाराष्ट्रात होणे गरजेचे आहे. अनेक ठिकाणी कामगारांचे मृत्यू होत आहेत यावर उपाययोजना व्हा.काशिनाथ नखाते म्हणाले कीजागतिक भूक निर्देशांक भारत १११ व्या स्थानी आला आहे यातून वास्तव दिसतेय, तळवडे येथे १४ महिला नागपूर येथील सालार कंपनीमध्ये ९ तर औरंगाबाद मध्ये काल नववर्षाच्या पूर्वसंख्येला ६ असे महिन्यात २९ कामगारांचा मृत्यू झाला आहे. याचे गांभीर्य सरकारला नाही. उतारवयामध्ये अनेक कामगार पाल्य असूनही निराधार आहेत आयुष्यभर प्रचंड अंग मेहनत करणाऱ्या कष्टकरी कामगारांना पेन्शन चालू झाले पाहिजे यासाठी आम्ही आग्रही राहू आजच्या परिषदेचा ठराव राज्य व केंद्र शासनाकडे पाठवून त्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल प्रास्ताविक किरण साडेकर यांनी केले तर आभार संघटक अनिल बारवकर यांनी मानले .