Pimpri

कलाकारांना महानगरपालिकेच्या वतीने मदत व्हावी – अमित गोरखे

By PCB Author

May 19, 2020

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवडमधील कलाकारांना महानगरपालिकेच्या वतीने मदत व्हावी,अशी मागणी कलारंग संस्थेचे अमित गोरखे यांनी महापालिका आयुक्त व महापौर यांच्याकडे पत्राद्वारे केली.

पत्रकात म्हटले आहे की,पिंपरी-चिंचवड मनपाच्या वतीने सांस्कृतिक धोरणांतर्गत अनेक संस्कृतिक उपक्रम राबविले गेले आहेत हे उपक्रम राबवताना पिंपरी-चिंचवडमधल्या स्थानिक कलाकारांना मनपाने वेळोवेळी संधी दिलेली आहे, परंतु कोविंड- 19 च्या पार्श्वभूमीवर या सर्व कलाकारांना पिंपरी चिंचवड मनपाच्या वतीने मदतीचे धोरण अवलंबून त्यांना मदत करणे गरजेचे आहे. पिंपरी-चिंचवड शहरात नृत्य कलाकार, गायन कलाकार, वादक यांच्यासमोर आर्थिक प्रश्‍न निर्माण झाले आहेत, कार्यक्रम, रेकॉर्डिंग, शिकवणी असे सर्व स्त्रोत बंद झाल्याने शास्त्रीय नृत्य सादर करणारे साथ-संगत करणारे सहकलाकार यांचे उत्पन्न थांबले आहे, केवळ कलेवरील उत्पन्नावर अवलंबून असणाऱ्या कलाकारांकडे सहा ते आठ महिने आगामी कसे काढायचे हा प्रश्न आहे, कार्यक्रमास लागणारे प्रकाश योजनाकार, ध्वनी योजना कार, मेकअप आर्टिस्ट पडद्यामागील कलाकार आधी सर्वच अडचणीत आहेत.

पिंपरी-चिंचवड मनपाने कला-क्रीडा संस्कृतीक धोरणा अंतर्गत आपली जबाबदारी म्हणून या सर्व कलाकारांना आर्थिक अथवा इतर पद्धतीने मदत करावी म्हणून मी हे ईमेल द्वारे पत्र देत आहे या पत्राचा गांभीर्यपूर्वक विचार व्हावा.