Pune

कलंक… सख्ख्या बहिणीचा विनयभंग करणा-या भावावर गुन्हा

By PCB Author

December 18, 2020

बोपखेल, दि. १८ (पीसीबी) – रात्री घरात झोपलेल्या सख्ख्या बहिणीसोबत अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केला. याबाबत आई-वडिल व भावाने जाब विचारला असता त्यांना शिवीगाळ करून बहिणीला हाताने व लाकडाने मारहाण केली. याबाबत नराधम भावाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना सप्टेंबर पासून 16 डिसेंबर 2020 या कालावधीत रामनगर, बोपखेल येथे घडली. पोलिसांनी 25 वर्षीय भावाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित बहीण ही आई-वडिलांकडे राहते. तिला दोन भाऊ आहेत. त्यापैकी आरोपी भाऊ आई वडिलांना नेहमी त्रास देतो. पीडित महिला घरात झोपलेली असताना आरोपी भाऊ तिच्याजवळ येऊन झोपला आणि तिच्याशी अश्लील चाळे केले. याचा जाब आई, वडील आणि दुस-या भावाने विचारला असता आरोपीने त्यांना शिवीगाळ केली. तसेच पीडित महिलेला हाताने व लाकडाने मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.