कर्वेनगर भागातील सामोसे तयार करणाऱ्या कारखान्यात सिलेंडरचा भीषण स्फोट; चारजण गंभीर

0
630

कर्वेनगर, दि. ११ (पीसीबी) – पुण्यातील कर्वेनगर भागातील एका सामोसे तयार करणाऱ्या कारखान्यात सिलेंडरचा अचानक स्फोट झाला. या घटनेत सामोसे तयार करणारे अन्नू चौहान आणि इतर तिघे जण  गंभीर जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात कर्वेनगर भागात मुख्य चौकाजवळ असलेल्या भालेकर एम्पायर इमारतीच्या तळ मजल्यावर सामोसे तयार केले जातात. या कारखान्यात चार मजूर सकाळी सहा वाजताच्या सुमारास  सामोसे तयार करत होते. त्यावेळी शेगडीला गॅस पुरवठा करणाऱ्या सिलेंडरची नळी निघाल्याने गॅसचा मोठा भडका उडाला. यामध्ये सामोसे तयार करणारे अन्नू चौहान आणि इतर तिघे जण  गंभीर जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी वारजे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.