Pune

कर्वेनगरमध्ये प्रेम संबंध मान्य नसल्याने प्रेयसीच्या भावाने केला प्रियकराचा कोयत्याने वार करुन निर्घृण खून

By PCB Author

January 29, 2019

पुणे, दि. २९ (पीसीबी) – बहिणीसोबतचे प्रेम संबंध मान्य नसल्याने प्रेयसीच्या भावाने तरुणाचा धारदार कोयत्याने सपासप वार करुन निर्घृण खून केला. ही धक्कादायक घटना सोमवारी (दि.२८) रात्री नऊच्या सुमारास कर्वेनगर येथे घडली.

सिद्धार्थ कलवडी (वय २५, रा. लक्ष्मी नगर वसाहत गल्ली नं. ३ डहाणूकर कॉलनी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी राहुल सरकार आणि त्याच्या तीन ते चार साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ कलवडी आणि आरोपी राहूल सरकार याच्या बहिणीमध्ये प्रमसंबंध होते. हे प्रमसंबंध राहूलला मान्य नव्हते. याच कारणावरुन राहूल सरकार आणि त्याच्या तीन ते चार साथीदारांनी धारदार कोयत्याने वार करुन सिध्दार्थचा खून केला. खून केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.