Desh

कर्नाटकात १६ जानेवारीनंतर राजकीय भूकंप; सत्तांत्तरासाठी मुंबईत हालचाली गतिमान

By PCB Author

January 14, 2019

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – कर्नाटकात १६ जानेवारीनंतर  राजकीय भूकंप होण्याची शक्यता असून त्याचे केंद्रबिंदू मुंबईत असेल, अशी खात्रीशीर माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. कर्नाटकातील जनता दल आणि काँग्रेसच्या आघाडी सरकारला अल्पमतात आणण्यासाठी काँग्रेसच्या आमदारांना मुंबईत नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. भाजपला कर्नाटकात सत्तेवर आणण्यासाठी भाजपने हालचाली गतिमान केल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. 

मुंबईतील एका वजनदार भाजप नेत्यावर काँग्रेस आमदारांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्या नेत्याने कर्नाटकातील १० काँग्रेस आमदारांची सोय मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये केली आहे. कर्नाटकातील आणखी काही काँग्रेस आमदारांची भाजपशी सौदेबाजी सुरु आहे. आणखी ४ काँग्रेस आमदार भाजपच्या गळाला लागण्याची शक्यता आहे.

कर्नाटक विधानसभेत च्या २२४ पैकी  भाजपने सर्वाधिक१०४ जागा मिळवल्या  आहेत. तर काँग्रेसला एकूण ७८ आणि जेडीएस ३८ जागा मिळाल्या होत्या. मात्र काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा देऊन सत्ता स्थापन केली आहे.   त्यामुळे काँग्रेस आणि जेडीएसच्या ११६ आमदारांच्या पाठिंब्यावर  जनता दल सेक्युलरचे नेते एच. डी. कुमारस्वामी कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत.