कर्नाटकात भाजपची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पीछेहाट

0
453

बेंगळुरू, दि. ३ (पीसीबी) – कर्नाटक विधानसभा निवडणुकीत  सत्तेपासून दूर राहिलेल्या भाजपची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही पीछेहाट झाली आहे.  आतापर्यंत हाती आलेल्या २ हजार २६७ जागांच्या निकालंमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. काँग्रेसला ८६४, भाजपला ७८८ तर जेडीएस आणि अपक्षांना २७७ जागांवर विजय मिळाला आहे.

भाजपने शिमोगा येथे विजय मिळवला आहे आणि म्हैसूर, तुमकूर नगर भागातही भाजप आघाडीवर आहे. मात्र, नगरपालिका, वॉर्ड आणि पंचायत समित्यांमध्ये भाजप पिछाडीवर आहे.

दरम्यान, याबाबत कर्नाटक भाजप अध्यक्ष बी. एस. येड्डियुरप्पा म्हणाले की,  आघाडी सरकारमुळे पक्षाला अपेक्षेनुसार कामगिरी करता आलेली नाही. मात्र, पक्ष लोकसभा निवडणुकीत चांगली  कामगिरी करेल. निवडणुकीपूर्वी येड्डियुरप्पांनी भाजप ५० ते ६० टक्के जागांवर निवडून येण्याचा दावा केला होता.