कर्नाटकात तीन ते चार दिवसांत भाजप सरकार – येडियुरप्पा

0
309

कर्नाटक, दि,१६ (पीसीबी) – कर्नाटकातील सत्तानाट्य सुरूच असून, मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्यातर्फे सादर केलेल्या विश्वासदर्शक ठरावाच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी विधानसभा अध्यक्षांनी दिवस निश्चित केला असतानाच, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांनी सत्तास्थापनेसंदर्भात महत्वाचे विधान केले आहे. भाजप येत्या चार-पाच दिवसांत सरकार स्थापन करणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

पुढील तीन-चार दिवसांत भाजपचे सरकार अस्तित्वात येईल असा मला विश्वास आहे. भाजप कर्नाटकात सुप्रशासन आणणार हे निश्चित आहे, असे येडियुरप्पा यांनी माध्यमांना सांगितले. कुमारस्वामी हे आघाडीचे सरकार वाचवण्यात अपयशी ठरतील. कुमारस्वामी हे मुख्यमंत्रिपदावर राहणार नाहीत. हे त्यांनाही ठाऊक आहे. ते पदाचा राजीनामा देतील, असा दावाही त्यांनी केला.