Desh

कर्नाटकात काँग्रेसच्या दोन आमदारांमध्ये जोरदार हाणामारी

By PCB Author

January 20, 2019

बंगळुरु, दि. २० (पीसीबी) – कर्नाटकातील काँग्रेसच्या दोन आमदारांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या हाणामारीत एक आमदार गंभीर जखमी झाला असून त्याला  रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  कर्नाटकातील इगल्टन रिसॉर्टमध्ये शनिवारी ही घटना घडली आहे.

आनंद सिंग आणि जे.एन.गणेश अशी काँग्रेस आमदारांची नाव आहेत.  या दोघांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यात एक आमदार जखमी झाला आहे. कर्नाटकमधील काँग्रेसच्या  सर्व आमदारांची  इगल्टन रिसॉर्टमध्ये बैठक बोलावली होती. यावेळी हा प्रकार झाल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, काँग्रसने या  घटनेवर सावध प्रतिक्रिया देताना सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. आनंद सिंग यांच्या छातीत दुखत  होते. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे सांगितले.

दरम्यान, काँग्रेस आणि जेडीएस यांच्यातील धुसफूस सुरू असून भाजप त्याचा फायदा घेत आहेत. यातच ही घटना घडली आहे. त्यामुळे भाजपला आणखी बळ मिळण्याची शक्यता आहे. कर्नाटकात सत्ताबदल करण्यासाठी भाजपने काँग्रेसच्या आमदारांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातच हा प्रकार समोर आल्याने काँग्रेससमोरील डोकेदुखी वाढणार आहे.