Banner News

कर्नाटकात अवघ्या चार मतांनी कुमारस्वामी सरकार कोसळले

By PCB Author

July 23, 2019

बेंगळुरू, दि. २३ (पीसीबी) – कर्नाटकमधील कुमारस्वामी सरकारविरोधातील विश्वासदर्शक ठरावावर आज (सोमवार)  मतदान झाले. यावेळी विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने ९९ मते पडली, तर ठरावाच्या विरोधात १०५ मते पडल्याने कुमारस्वामी सरकार अखेर कोसळले.  अवघ्या चार मतांनी कुमारस्वामींना बहुमत गमवावे लागले.    

आजर संध्याकाळी ७.३० वाजता कुमारस्वामींनी विश्वासदर्शक ठराव मांडला.  १६ बंडखोर आमदार विधानसभेत अनुपस्थित  राहिले. त्यामुळे कुमारस्वामी यांच्याकडे बहुमतासाठी  १०३  इतके संख्याबळ असल्याने कुमारस्वामींना बहुमताचा आकडा गाठता आला नाही.  ठरावाच्या बाजूने केवळ ९९ मते पडल्याने अवघ्या चार मताने कुमारस्वामी सरकार कोसळले. तर ठरावाच्या विरोधात १०५ मते पडली.

यावेळी भाजपचं एकही मत फुटलं नाही. जेडीएस-काँग्रेसचे १६ बंडखोर आमदार सभागृहात अनुपस्थित राहिले तर बसपाचा उमेदवार तटस्थ राहिल्याने कुमारस्वामींना विश्वासदर्शक ठराव जिंकता आला नाही.