Pimpri

कर्णबधीर तरुणीवर बलात्कार करणाऱ्या तरूणावर पिंपरीत गुन्हा दाखल

By PCB Author

March 07, 2019

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) – मावळ तालुक्यातील लोहगड येथे २१ वर्षीय कर्णबधीर तरुणीवर मागील पाच महिन्यांपासून वारंवार बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी एका  तरुणावर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पीडित तरुणीच्या आईने फिर्याद दिली होती. त्यानुसार २६ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी कर्णबधीर आहे. आरोपी हा पीडितेच्या मामाचा मुलगा आहे. आरोपीने पीडितेच्या घरी जाऊन ऑक्टोबर २०१८ ते २८ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत वारंवार बलात्कार केला. आरोपी हा नातेवाईक असल्याने पीडितेच्या घरच्यांना संशय आला नाही. पीडित तरुणी गरोदर राहिली. त्यानंतर हा प्रकार समोर आला. अधिक तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.