Notifications

कर्ज फेडतो, मात्र व्याज मिळणार नाही; विजय मल्ल्याची बँकांना ऑफर

By PCB Author

December 05, 2018

नवी दिल्ली, दि. ५ (पीसीबी) – भारतीय बँकांना हजारो कोटींचा चुना लावून परदेशात पसार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्याने बँकांचे कर्ज फेडण्यास  तयार असल्याचे म्हटले आहे. मात्र, त्यांने मोठी अट घातली आहे. १०० टक्के कर्ज फेडण्यास तयार आहे. मी कर्जाच्या मुद्दलीची परतफेड करु शकेन, पण व्याजाची रक्कम देऊ शकणार नाही, असे विजय मल्ल्याने म्हटले आहे.