कर्जबाजारी सोलार व्यापाऱ्याची आत्महत्या

0
469

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – आर्थिक नुकसान सहन न झाल्याने मुंबईतील पवई या ठिकाणी एका व्यावसायिकाने त्याच्या कारमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. विनीत सिंग असं या व्यावसायिकाचं नाव आहे. तो सोलार उपकरणांचा व्यापारी होता. मात्र लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर त्याला प्रचंड आर्थिक झळ बसली जी सहन न झाल्याने त्याने कारमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. पोलिसांना या ठिकाणी कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. त्याने आपल्याला दिल्लीला जायचे आहे असे घरी सांगितले होते. बुधवारी हे कारण देऊन तो घराबाहेर पडला होता. शुक्रवारी मुंबईतील पवई भागात कारमध्ये त्याचा मृतदेह आढळला.

विनीत सिंगने दोन बँकांमधून कर्ज घेतलं होतं. तसंच तो सोलार उत्पादनांचा व्यवसाय करत होता. त्याला दारुचंही व्यसन होतं. लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर त्याला व्यवसायात तोटा सहन करावा लागला. विनीतचा मृतदेह जैन मंदिर मार्गावर असलेल्या कारमध्ये सापडला. कारमधून मोठ्या प्रमाणत दुर्गंधी येत होती, ज्यासंबंधीची तक्रार स्थानिकांनी केली होती. त्यानंतर घटनास्थळी पोलीस आले आणि सदर प्रकार उघडकीस आला अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर कांबळे यांनी दिली.