‘करोना विरुद्धच्या लढाईत भारत अजून हिंमत हरलेला नाही’

0
405

नवी दिल्ली, दि.१४ (पीसीबी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘करोना विरुद्धच्या लढाईत भारत अजून हिंमत हरलेला नाही, भारतवासी हिंमत हारलेले नाहीत’ असं सांगितलं. करोनाशी लढण्यासाठी सरकार शक्य ते प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याच्या वाटपानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळालेल्या लाभाचीही माहिती दिली. त्यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितलं की, देशातल्या एकूण नऊ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून १९ कोटी रुपये जमा कऱण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. या मदतीचा आठवा टप्पा जमा करण्यात आला. त्याप्रसंगी पंतप्रधान बोलत होते. बंगालमधल्या शेतकऱ्यांना प्रथमच या योजनेचा लाभ मिळत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

देशातल्या करोना परिस्थितीवरही त्यांनी यावेळी भाष्य केलं. देशातल्या ग्रामीण भागामध्ये करोना फोफावत असल्याचंही त्यांनी सांगितलं. नागरिकांना लस घेण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. लस घेतली तरीही मास्क वापरणं बंधनकारक असल्याचंही त्यांनी सांगितलं. देशात आत्तापर्यंत १८ कोटी लोकांनी लस घेतल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. ‘करोनाशी लढण्यासाठी सरकार शक्य ते सगळे प्रयत्न करत आहे. भारत अजूनही हिंमत हरलेला नाही, भारतवासी हिंमत हरणार नाहीत.’