करोनाचा आता महात्मा फुले आरोग्य योजनेत समावेश – आरोग्यमंत्री राजेश टोपे

0
516

 

मुंबई, दि.३० (पीसीबी) – करोनाबाधितांना दिलासा देणारा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. याअंतर्गत महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत करोना उपचाराचा समावेश करण्यात आला आहे. त्पयामुळे या रुग्णांना कॅशलेस उपचाराची सुविधा मिळणार आहे. १ एप्रिलपासून राज्यभरात या योजनेंतर्गत सुमारे १००० रुग्णालयांचा समावेश होणार आहे. त्यामध्ये करोनाबाधीत मोफत उपचार घेऊ शकतील. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

या महत्वपूर्ण निर्णयामुळे योजनेतील सहभागी रुग्णालयातील सुमारे २००० व्हेंटीलेटर्स देखील उपलब्ध होणार ? आहेत”“करोनाच्या नियंत्रणासाठी राज्य शासन करीत उपाययोजनांच्या माध्यमातून नागरिकांना दिलासा देण्याचे काम केले जात आहे. राज्यात महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून सामान्यांना दीर्घ व उपचाराचा खर्च न परवडणाऱ्या आजारांवर उपचार व शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात. या योजनेत राज्यभरातील ४९२ खासगी रुग्णालये सहभागी आहेत.

येत्या १एप्रिलपासून त्यामध्ये दुपटीने वाढ होऊन १००० रुग्णालयांचा समावेश होईल. जनआरोग्य योजनेंतर्गत खासगी रुग्णालयांच्या सहभागाची संख्या वाढणार आहे. यामुळे कोरोनाच्या उपचारासाठी आवश्यकता भासल्यास किमान २००० व्हेंटीलेटर्स उपलब्ध होवू शकतात. त्याचबरोबर सुमारे १ लाख खाटाही यामाध्यमातून उपलब्ध होणार आहेत”, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.