Chinchwad

कराटे स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचा नगरसेवक नाना काटेंच्या हस्ते सत्कार

By PCB Author

January 21, 2019

चिंचवड, दि. २१ (पीसीबी)- निगडी येथे झालेल्या युनिव्हर्सल शोतोकनच्या वतीने आयोजित २४ व्या डो जो कराटे कुमीते चँपियनशिप स्पर्धेत यशस्वी स्पर्धकांचा राष्ट्रवादीचे नगरसेवक नाना काटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी नगरसेवक नाना काटे खेळाडूंना मार्गदर्शन करताना म्हणाले, “खेळामुळे शरीराला व्यायाम होतो. मुलांचे आरोग्य चांगले राहते. त्यामुळे मुलांनी जास्तीत जास्त मैदानी खेळ खेळायला हवेत.आपल्या परिसरातील अनेक खेळाडू चांगल्या प्रकारे घडावेत आणि राज्य तसेच राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव उज्वल करावे यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.”

या स्पर्धेतील यशस्वी स्पर्धक -सुवर्णपदक विजेते मंदार ठाकरे, अवनी गजेंद्रगढ, रौप्यपदक विजेते -निलय सांगळे, उत्तेजनार्थ-अद्वैत मराठे, हर्ष पाटील, कास्यपदक विजेते- अथर्व केसरी, अमोघ चिंचोलीकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कुंदन इस्टेटचे चेअरमन कुलदीप देशमुख, योगेश जाधव, भूषण सोनोने, राजेश पाटील, दरेकर, तनपुरे, ऋषी पाटील, सुनिल कामदे, कुंदन इस्टेटचे सेक्रेटरी गावडे, नायरआणि कुंदन इस्टेटमधील सभासद नागरिक उपस्थित होते.