Entertainment

करणं जोहरच्या घरी झाली होती ड्रग्स पार्टी ?

By PCB Author

September 26, 2020

मुंबई,दि.२६ (पीसीबी) : सुशांत प्रकरणात आता एनसीबीच्या चौकशी दरम्यान बॉलीवूडमधील खूप मोठी नाव समोर आलीत. आता या ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूड दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरची देखील एनसीबीकडून चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काही दिवसांपूर्वी करण जोहर याने २८ जुलैला त्याच्या घरी पार्टी दिली होती. तर या पार्टीत ड्रग्ज घेतल्याच्या अफवा दरम्यान पसरवल्या जात असल्याचे करणचे म्हणणे आहे.

“याधीही मी सांगितलं होतं आणि पुन्हा सांगतोय त्या पार्टीमध्ये ड्रग्ज नव्हते. मी ड्रग्ज घेत नाही आणि अशा कोणत्याही प्रकारच्या पदार्थांना मी प्रोत्सहन देत नाही.” असं करणने स्पष्टीकरण देताना म्हंटले आहे.