कमीत कमी राज्यपालांनी तरी विधान परिषदेसाठी माझ्या नावाचा विचार करावा – सुरेखा पुणेकर

0
329

पुणे,दि.२४(पीसीबी) – कमीत कमी राज्यपालांनी तरी विधान परिषदेसाठी माझ्या नावाचा विचार करावा, अशी मागणी जेष्ठ लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी केली आहे.

महाराष्ट्रातील लावणीसम्राज्ञी म्हणून सुरेखा पुणेकर या सर्वांनाच परिचयाच्या आहेत. मात्र आता तमाशाच्या फडातील सुरेखाताईंनी राजकारणाचा फड रंगवण्याचा विचार केला आहे. महाविकासआघाडी सरकारनं विधान परिषदेसाठी आपल्या नावाचा विचार करावा, असं वक्तव्य सुरेखाताईंनी केलं आहे. लोकसभा निवडणुकीवेळी पुण्यातून काँग्रेस सुरेखाताईंना तिकीट देणार असल्याचं चर्चेत होतं. मात्र ताईंना तिकीट काही मिळालं नाही. त्यामुळे आता तरी विधान परिषदेसाठी तिकीट मिळावं, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान जर कुठल्याच पक्षाकडून मला विधान परिषदेसाठी तिकीट मिळालं नाही तर राज्यपालांनी तरी किमान माझ्या विचार करावा, अशी विनंतीही सुरेखाताईंनी केली आहे.