Pune Gramin

कमिशनच्या ‘एवढ्या’ पैश्यांची मागणी करत दिली गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी

By PCB Author

March 24, 2021

खेड, दि. 24 (पीसीबी) – रस्त्यामध्ये कार अडवून कमिशनचे आणखी 20 लाख रुपये पाहिजे, अशी मागणी करत व्यावसायिकाला मारहाण केली. त्यानंतर गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार मंगळवारी (दि. 23) रात्री खेड तालुक्यातील वाकी तर्फे वाडा येथे घडला.

विजयपाल किशेरीलाल शर्मा (वय 53, रा. कडाचीवाडी, ता. खेड) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अभिमन्यू शेलार (रा. चाकण) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शर्मा हे व्यावसायिक आहेत. ते मंगळवारी त्यांच्या कार (एम एच 14 / जे एन 9549) मधून ड्रायव्हर सोबत वाकी येथील फार्महाऊसवर गेले होते. तिथून घरी परतत असताना वाकी वाडा येथील जॅकवेलजवळ आरोपीने त्याची गाडी रस्त्यात आडवी लावून फिर्यादी यांना अडवले. आरोपीने फिर्यादी यांच्याकडे कमिशनचे आणखी 20 लाख रुपये पाहिजे असल्याची मागणी केली. फिर्यादी यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली व तुला गोळ्या घालून खल्लास करतो, असा दम दिला. हा प्रकार फिर्यादी यांचा ड्रायव्हर मोबाईलमध्ये शूटिंग करत होता. आरोपीने ड्रायव्हरला शिवीगाळ करून छातीवर मुक्कामात दिला आणि त्याचा मोबाईल फोन दगडावर आपटून फोडला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.