Maharashtra

कमळाच्या दोन पाकळ्या आता शिवसेनेच्या हाती; भाजपच्या ‘या’ दोन बड्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश

By PCB Author

January 08, 2021

मुंबई, दि.०८ (पीसीबी) : कालच एक शिवसैनिक राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले. त्यामुळे राष्ट्रवादीने शिवसेनाला जबर फटका दिला. आणि आता मात्र शिवसेना आज भाजपाला मोठा धक्का देणार आहे. नाशिकमधील दोन बडे नेते पुन्हा एकदा धनुष्यबाण हाती घेणार आहेत. याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या नेत्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांचा शिवसेनेत प्रवेश निश्चित झाल्याचे कळते. यामुळे नाशिकमध्ये शिवसेनेची ताकद आता आणखी वाढणार असं दिसतंय.

वसंत गीते आणि सुनील बागूल अशी या नेत्यांची नाव आहेत. गीते हे नाशिकमधील शिवसेनेचे पहिले महापौर होते. तर बागूल हे जिल्हा प्रमुख होते. मात्र, सध्या भाजपामध्ये त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे सांगत त्यांनी पक्षातून काढता पाय घेतला आहे. अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. दरम्यान, शिवसेनेतून बाहेर पडत राज ठाकरेंनी मनसेची स्थापना केल्यानंतर गीते त्यांच्यासोबत गेले. पुढे ते मनसेकडून आमदारही झाले. त्यानंतर ते सत्ताधारी भाजपामध्ये सामिल झाले. तर बागूल शिवसेनेतून बाहेर पडत राष्ट्रवादीत आणि नंतर भाजपात गेले. सुनील बागूल यांच्या आई नाशिक महापालिकेत सध्या भाजपाच्या उपमहापौर आहेत.