Desh

कमलनाथांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; माजी मुख्यमंत्री शिवराज सिंहांची व्यासपीठावर उपस्थिती

By PCB Author

December 17, 2018

भोपाळ, दि. १७ (पीसीबी) – मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाची तर ज्योतिरादित्य सिंधिया यांनी उपमुख्यमंत्रीपदाची  शपथ आज (सोमवार) घेतली.  राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या शपथविधी सोहळ्याला उपस्थित असलेले भाजपचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी दोन्ही नेत्यांचे अभिनंदन केले.  यावेळी कमलनाथ आणि सिंधिया यांनी शिवराज सिंह यांना मध्ये उभे करत हात हातात घेऊन उंचावले आणि उपस्थितांना अभिवादन केले, या दृश्यांमुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.  

राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी कमलनाथ यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. या सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह समविचारी पक्षाचे अनेक नेते उपस्थित होते.

या शपथविधी सोहळ्याला शिवराज सिंह चौहान आवर्जून उपस्थित राहिले. त्यांनी दोन्ही नेत्यांचे अभिनंदन केले. यावेळी कमलनाथ आणि सिंधिया यांनी शिवराज यांना मध्ये उभे केले. त्यांचे हात हातात घेऊन उंचावले आणि उपस्थितांना अभिवादन केले.  या सोहळ्या निमित्ताने राज्यातील नेत्यांच्या मनाची उदारता दिसून आली.