Desh

कधी कधी भावना व्यक्त करणं जमत नाही; आता तेच होतंय इरफानदा! – पंकज त्रिपाठी

By PCB Author

April 29, 2020

नवी दिल्ली, दि.२९(पीसीबी) – कधी कधी भावना व्यक्त करणं जमत नाही; आता तेच होतंय इरफानदा!, असं भावूक ट्विट करत प्रसिद्ध अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी अभिनेते इरफान खान यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

आपल्या दमदार अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारा अभिनेता इरफान खान .यांचं आज निधन झालं. त्यांच्या शिष्याने म्हणजे पंकज त्रिपाठीने इरफानप्रति आपल्या भावना व्यक्त करताना निशब्द व्हायला होतं आहे तसंच कंठ दाटून आला आहे, असं म्हटलं आहे. कधी कधी भावना व्यक्त करणं जमत नाही; आता तेच होतंय इरफानदा, असं ट्विट पंकज त्रिपाठीने केलं आहे. पंकज त्रिपाठी इरफान खान यांना आपला गुरू मानत असे. त्यांचं एक खास नातं होतं. दोघांमध्ये विशेष जिव्हाळा होता.

दरम्यान पंकज त्रिपाठीने इरफान खान यांच्यासोबत काढलेले काढलेले फोटो शेअर करताना तसंच भावना व्यक्त करताना निशब्द व्हायला होतं आहे, असं म्हटलं आहे. इरफान खान यांच्याकडून मी खूप काही शिकलो असल्याचं पंकजने म्हटलं आहे.