Pimpri

कठीण वस्तूने डोक्यावर वार करून निर्घृणपणे खून

By PCB Author

December 19, 2020

चिखली, दि.१९ (पीसीबी) : कामगाराचा कठीण वस्तूने डोक्यावर वार करून निर्घृणपणे खून करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी तळवडे, चिखली येथे उघडकीस आली.

जीवन नंदलाल शर्मा (वय 40, सध्या रा. त्रिवेणीनगर, तळवडे. मूळ रा. आसाम) असे खून झालेल्या कामगाराचे नाव असून राहुल ज्ञानेश्वर भालेकर यांनी चिखली पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जीवन शर्मा हे फिर्यादी राहुल भालेकर यांच्याकडे कामाला होते. भालेकर यांची त्रिवेणीनगर तळवडे येथे पेईंग गेस्ट (पीजी) इमारत आहे. त्या इमारतीच्या देखभालीचे काम फिर्यादी यांनी मयत शर्मा यांना दिले होते. गुरुवारी (दि.17) रात्री साडेआठच्या सुमारास शर्मा नेहमीप्रमाणे त्यांच्या खोलीत झोपले होते. दरम्यान, रात्री अज्ञात इसमाने कठीण वस्तूने शर्मा यांच्या डोक्यात मारून त्यांचा खून केला. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी फिर्यादी भालेकर यांना शर्मा त्यांच्या खोलीत रक्ताच्या थारोळ्यात पडले असल्याचे समजले. भालेकर यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. स्थानिक पोलिसांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत.