कट्ट्यावर बसलेल्या तरुणाचा मोबाइल पळविला

0
351

भोसरी, दि. २२ (पीसीबी) – कट्ट्यावर बसलेल्या तरुणाचा मोबाइल दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी पळवून नेला. ही घटना शनिवारी (दि. 17) सकाळी गुळवे वस्ती, भोसरी येथे घडली.

सनी नामदेव सावंत (वय 19, रा. देवकर वस्ती, चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी बुधवारी (दि. 21) याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दुचाकीवरील तीन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास फिर्यादी सावंत हे गुळवे वस्ती, भोसरी येथील कट्ट्यावर बसले होते. त्यांनी आपला मोबाइल बाजूला ठेवला होता. त्यावेळी दुचाकीवरून तीन चोरटे आले. त्यातील एक तरुण दुचाकीवरून खाली उतरला. त्याने कट्ट्यावर ठेवलेला सावंत यांचा पाच हजार रुपये किंमतीचा मोबाइल उचलला आणि पळत जाऊन दुचाकीवर बसला. त्यानंतर तिन्ही चोरटे पळून गेले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.