Pimpri

कचराकुंडीत दोन नवजात जुळ्या बालकांना सोडून पलायन केलेल्या माता पित्यास अटक

By PCB Author

January 22, 2020

पिंपरी, दि.२२ (पीसीबी) – चतुश्रृंगी येथील पाषाण तलावाजवळ महादेव मंदिराकडे जाणाऱ्या रोडवर कचराकुंडी मध्ये दोन जिवंत जुळी नवजात बालके एक स्त्री जातीचे व एक पुरूष जातीचे बालक उघड्यावर सोडून जाणाऱ्या माता पित्यास चतुश्रृंगी पोलिसांनी  अटक  केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चतुश्रृंगी पोलीस पथकाने या घटनेचा तपास केल्यानंतर पुणे रूग्णालयांना भेट  देऊन माहिती घेतली. या तपासात जननी नर्सिंग होम, कर्वेनगर येथे १३ जानेवारी रोजी एका पुरूषाने महिलेला डिलिव्हरीसाठी अॅडमिट केले होते. या महिलेने  पहाटे ४:३० वाजता एक पुरूष जातीच अर्भक आणि एक स्त्री जातीच असे या जुळ्या नवजात बालकांना जन्म दिला. त्यानंतर हे दोघे १४ जानेवारी रोजी हॉस्पीटल मधून न सांगता त्यांनी दोन्ही बालकांना घेऊन पलायन केले. त्यानंतर त्या जुळ्या नवजात बालकांना पाषाण तलावाजवळ महादेव मंदिराकडे जाणाऱ्या रोडवर कचराकुंडी मध्ये टाकून दिले. तपास करीत असताना रूग्णालयात आलेल्या एका महिलेवर संशय आल्याने तिने दिलेल्या पत्त्याचा शोध पोलिसांनी घेतला. ती महिला मागील एक वर्षापासून त्या पत्त्यावर राहत नसल्याचे समजले. त्यानंतर महिलेचा शोध घेत असताना पोलिस नाईक प्रकाश आव्हाड व सचिन कांबळे यांना मिळालेल्या माहितीवरून  पोलिस शिपाई ज्ञानेश्वर मळे यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणावरून संबधित महिला ही वडगाव ब्रुदुक भागात राहत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानंतर अप्पर पोलिस आयुक्त सुनिल फुलारी, पोलिस उप आयुक्त पंकज देशमुख, सा.पोलिस आयुक्त लक्ष्मण बोराडे  यांना देऊन  त्यांनी केलेल्या सुचनेप्रमाणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक  अनिल शेवाळे, पोलिस निरीक्षक  माया देवरे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मोहन जाधव, राकेश सरडे, कर्मचारी हवालदार  एकनाथ जोशी, पोलिस हवालदार मुकुंद तारू, मारूती पारधी, वारजे पोलिस ठाण्याच्या टिमने सदर महिला व तिची पती प्रियकर यांना वडगाव मधून ताब्यात घेतल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे ते म्हणाले  हे दोन्ही नवजात बालके आमचीच आहेत आम्ही कचऱ्याच्या कुंडी मध्ये फेकून दिले होते. प्रेमसंबंधामधून या मुलांचा झाल्याची बाब समोर आली आहे.