Chinchwad

कंपनीत गुंतवणुक करण्यास सांगून तरुणाला सव्वादोन लाखांचा गंडा; पैसे परत मागितल्यावर दिली जीवे मारण्याची धमकी

By PCB Author

June 11, 2019

हिंजवडी, दि. ११ (पीसीबी) – ‘युनिट नेटवर्किंग मार्केटिंग’ या कंपनीत २ लाख ३५ हजार रुपयांची गुंतवणुक करण्यास सांगून एका तरुणाला सहा जणांच्या टोळीने गंडा घातला. ही घटना एक वर्षापूर्वी हिंजवडी येथे घडली.

याप्रकरणी अमोल विजय तिरपुडे (वय २७, रा. सुसगाव) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सुशील पाटील, सुरेश दुबे, पार्थ, स्वाती, पियुश सुरेश दुबे आणि कुनाल कुमार मनोहर नखाते (वय २७) या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक वर्षापूर्वी आरोपींनी अमोल याला युनिट नेटवर्किंग मार्केटिंग या कंपनीत २ लाख ३५ हजारांची रक्कम गुंतवणुक करण्यास सांगितले होते. यावर अमोल यांनी तेवडी रक्कम कंपनीत गुंतवली मात्र वर्ष होऊन गेले तरी आरोपींनी अमोला याला कुठल्याही प्रकारचा मोबदला दिला नाही. यामुळे अमोलने आरोपींकडे पैशांसाठी तगादा लावला. यावर आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांनी पियुश आणि कुनाल या दोघांना अटक केली आहे. तर इतर आरोपींचा शोध घेत आहेत. पोलीस उपनिरीक्षक गोविंद पवार अधिक तपास करत आहेत.