Pune

कंपनीतील कामगार महिलेशी अश्लील चाळे; असिस्टंट मॅनेजरला अटक

By PCB Author

January 28, 2022

चाकण, दि. २८ (पीसीबी) – कंपनीत काम करणाऱ्या कामगार महिलेसोबत अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केला. हा प्रकार 12 डिसेंबर 2021 ते 19 जानेवारी 2022 या कालावधीत म्हाळुंगे येथील व्हेरॉक इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीत घडला. पोलिसांनी आरोपी असिस्टंट मॅनेजरला अटक केली आहे.

जाक्सन अरुण आल्हाट (वय 34, रा. भैरवनगर, धानोरी रोड, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी 30 वर्षीय कामगार महिलेने गुरुवारी (दि. 27) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पीडित महिला व्हेरॉक इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीत काम करतात. काम करत असताना आरोपी असिस्टंट मॅनेजर याने त्याच्या पदाचा दुरुपयोग करून फिर्यादी यांच्या मोबाईलवर अश्लील मेसेज पाठवले. तसेच त्यांच्याशी अश्लील चाळे करत त्यांचा विनयभंग केला. तसेच पीडित कामगार महिलेने हा प्रकार कोणाला सांगू नये म्हणून आरोपीने फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक विनोद शेंडकर तपास करीत आहेत.