कंपनीतील कामगारास विनाकारण मारहाण

0
206

पिंपरी, दि. 15 (पीसीबी): कंपनीत काम करत असलेल्या एका कामगाराला एका तरुणाने विनाकारण मारहाण केली. तसेच तुला सोडणार नाही अशी धमकी दिली. ही घटना सोमवारी (दि. 13) सायंकाळी वासुली येथील किंफा सायन्स अँड टेक्नॉलॉजी या कंपनीत घडली.

भावेश चंद्रकांत बोराडे (वय 21, रा. कडूस शेडवाडी, ता. खेड) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार किशोर कुंडलिक शेंडे (वय 26, रा. कडूस, ता. खेड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे वासुली येथील किंफा सायन्स अँड टेक्नॉलॉजी या कंपनीत गाडीमध्ये मटेरियल भरण्याचे काम करत होते. त्यावेळी आरोपी तिथे आला. त्याने काहीही न बोलता विनाकारण फिर्यादी यांना शिवीगाळ करून लाकडी फळीने मारहाण केली. तसेच तुला सोडणार नाही अशी धमकी दिली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.