कंत्राटदारांना मनसेच्या शैलीत जाब विचारा – राज ठाकरे

0
387

मुंबई, दि. ८ (पीसीबी) – हजारो कोटी रुपये खर्च करुन रस्ते बांधले जातात. तरीही रस्त्यांची दुर्दशा का होते?, हजारो कोटी रुपये कंत्राटदाराच्या घशात घालायला दिले जातात का? असा सवाल विचारतानाच या कंत्राटदारांना मनसेच्या शैलीत जाब विचारा, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

मुंबईत रवींद्र नाट्यमंदिरात राज ठाकरे कोकणवासीयांच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी कोकणातील रस्त्यांवरुन त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. हजारो कोटी रुपये खर्च करून रस्ते बांधले जातात तरीही रस्त्यांची दुर्दशा का?, यंदा गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाल तेव्हा ह्या कंत्राटदारांना मनसेच्या शैलीत जाब विचारा, असे ते म्हणाले.

नाशिक महापालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता हातात असताना तिथे जे रस्ते बांधले गेले ते अजूनही खड्डेविरहित आहेत. का? कारण कंत्राटदारांना तशी तंबी देऊन ठेवली होती, असे त्यांनी नमूद केले.