Desh

कंगना रनौतनं बंगाल हिंसाचारावर भाष्य करत घेतला ‘पंगा’; कंगना रानौतच ट्विटर हँडल सस्पेंड

By PCB Author

May 04, 2021

मुंबई, दि.०४ (पीसीबी) : बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौतचे ट्विटर हँडल सस्पेंड करण्यात आले आहे. कंगनाने ट्विटरच्या नियमांचं उल्लंघन करणारी पोस्ट शेअर केल्यामुळे तिच्यावर ही कारवाई करण्यात आली. बंगाल हिंसाचारावरील ट्वीट्सनंतर कारवाई करण्यात आली. नुकत्याच झालेल्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये झालेल्या कथित हिंसाचाराबद्दल अभिनेत्रींनी ट्वीटच्या करत आक्षेपार्ह भाष्य केले होते. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात टीएमसी विजयी झाल्यानंतर कंगनाने पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. अभिनेत्री कंगना रनौतने मायक्रो-ब्लॉगिंग साईटच्या नियमांविरूद्ध मजकूर पोस्ट केल्यानंतर तिचे ट्विटर अकाऊंट निलंबित करण्यात आले आहे.

पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांचे सरकार स्थापन झाले आहे. ज्यानंतर कंगना टीएमसीविरोधात अनेक प्रकारचे ट्विट करत होती. सोशल मीडियावर कंगना अनेकदा भाजपा आणि पंतप्रधानांच्या समर्थनार्थ दिसली. अशा परिस्थितीत आता पश्चिम बंगालमध्ये ज्याप्रकारे हिंसाचार घडत आहेत त्यावर कंगनाने टीएमसीला लक्ष्य केले आहे. कंगनाने नुकतेच एक धक्कादायक ट्विट देखील केले होते. कंगनाने तिच्या ट्विटमध्ये लिहिले होते की, ‘मी चूक होते, ती रावण नाही. रावण तर सर्वोत्कृष्ट राजा होता, त्याने जगातला सर्वोत्कृष्ट देश बनवला, एक महान प्रशासक, अभ्यासक आणि वीणावादक होता आणि आपल्या प्रजेचा राजा होता. ती एक रक्तपात करणारी राक्षस आहे. ज्या लोकांनी त्यांना मतदान केले आहे, त्यांचे हात रक्ताने माखलेले आहेत.’ असं म्हणत कंगनाने उघडउघड्पणे सोशल मीडियावरून भाजपा आणि पीएम मोदींना समर्थन दिले. आणि काही आक्षेपार्ह ट्विट्स केले त्यामुळे कंगनाचे ट्विटर खाते निलंबित केले गेले आहे.