कंगनाच्या हेअर स्टाइलिस्टला १६ वर्षीय मुलासोबत अनैसर्गिक सेक्स केल्याचा आरोपावरुन अटक

0
1566

मुंबई, दि. २९ (पीसीबी) – बॉलिवूड अॅक्ट्रेस कंगना रनावतचा मेकअप आर्टिस्ट ब्रेंडन एलिस्टर डी गी याला खार पोलिसांनी अटक केली आहे. ब्रेंडनवर एका १६ वर्षीय मुलासोबत अनैसर्गिक सेक्स केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्जत येथे कंगनाचा अपकमिंग मूव्हीची शूटिंग सुरु होती. ब्रेंडना याला पोलिसांनी शुटिंगच्या सेटवरच अटक केली. खार पोलिस स्टेशनचे सीनियर इन्स्पेक्टर संजय मोरे यांनी सांगितले की, कंगनाच्या हेअर स्टाइलिस्टला बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदानुसार (पॉक्सो) अटक करण्यात आली आहे.