Others

औषधांच्या स्ट्रीपवर हि लाल रंगाची पट्टी का असते माहितीये…

By PCB Author

December 16, 2020

आपण अनेकजण जेव्हा आजारी पडतो तेव्हा डॉक्टरकडे न जाता थेट मेडिकल स्टोअरमध्ये जातो आणि औषध खरेदी करतात. कारण या औषधांच्या सेवानाने आपल्याला ठीक वाटत आणि दुखणं थांबत. परंतु याचे काही गंभीर परिणामही भोगावे लागतात ते एका ठराविक वेळेनंतर.

जर कधी आपण जर नीट लक्षपूर्वक पाहिलं तर आपल्या लक्षात येईल कि, औषधांच्या स्ट्रीपवर मागील बाजूस लाल रंगाची पट्टी बनवलेली असते. तुम्हाला या पट्टीबद्दल माहिती आहे का? कि ती लाल पट्टी का असते…. नसेल माहित तर चला जाणून घेऊ

या लाल रंगाच्या या पट्टीबद्दल डॉक्टरांना अधिक माहिती असते, मात्र सर्वसाधारण लोकांना याबद्दल जास्त माहिती नसते. जर कोणी डॉक्टरांच्या सल्याबिना मेडिकल स्टोअरला जाऊन औषध खरेदी करून त्याचे सेवन करतात तर, आजार बरे न होता उलट दुसरीच समस्या उद्भवू शकते. त्यामुळे औषधं खरेदी करताना हलगर्जीपणा करू नये. औषधांच्या पाठीमागील लाल रंगाच्या पट्टीचा अर्थ आहे कि, हे औषध डॉक्टरांच्या चिठ्ठीविना हे सेवन करता येत नाही आणि याची विक्रीही करू शकत नाही. एंटीबायोटिक औषधांचा गैरवापर थांबवण्यासाठी औषधांवर लाल रंगाची पट्टी बनवली जाते.

या लाल रंगाच्या पट्टीशिवाय औषधांवर आणखी काही महत्वाचे सूचनात्मक चिन्ह बनवलेले असते, आणि याबद्दल सुद्धा आपणास माहिती असणे जरुरी आहे.

काही ठराविक औषधांवर XRX असेही लिहिलेले असते, याचा अर्थ आहे हे औषध आपणास केवळ डॉक्टरजवळच मिळू शकते याची विक्री कोणत्याही मेडिकल स्टोअरवर नाही होत. या औषधाला पेशंट थेट डॉक्टर जवळून घेऊ शकतो.

काही विशिष्ठ औषधांच्या पट्टीवर RX लिहिलेले असते, RX चा अर्थ आहे कि त्या औषधांना केवळ डॉक्टरांच्या परवानगीनेच घ्यावे. तर काही औषधांवर NRX लिहिलेले असते याचा अर्थ या औषधांचे सेवन करण्याचे तेच डॉक्टर सांगू शकतात ज्यांच्या जवळ नाशा आणणाऱ्या औषधांचे योग्य प्रमाणपत्र आहे. याव्यतिरिक्त असे अनेक चिन्ह औषधांवर असतात त्यामुळे यापुढे आपण मेडिकल स्टोअरवर जाऊन औषध न घेता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यावे यामुळे भविष्यात होणाऱ्या संभाव्य धोक्याला आपण दूर ठेऊ शकतो.