Maharashtra

औरंगाबाद येथील एमआयएमचा नगरसेवका विरोधात बलात्काराचा गुन्हा

By PCB Author

January 16, 2019

औरंगाबाद, दि. १६ (पीसीबी) – नोकरी आणि लग्नाचे आमिष दाखवून एका ३० वर्षीय विवाहितेनेवर एमआयएमचा औरंगाबाद महापालिकेतील निलंबित नगरसेवक सय्यद मतीन याने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

याप्रकरणी मंगळवारी (दि.१५) सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडित ३० महिलेला दोन मुले आहेत. पतीने सोडून दिल्याने ती आईसोबत राहते. वर्षभरापूर्वी आधार कार्ड तयार करून घेण्यासाठी गेली असता सय्यद मतीनने नोकरी मिळवून देतो, लग्न करतो, असे आमिष दाखवून तिच्याशी जवळीक निर्माण केली. नंतर रशीदपुरा, टाऊन हॉल येथे एका घरात तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकीही दिली. यावर पीडितेने पोलिस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन मतीनविरुद्ध तक्रार दिली. अधिकाऱ्यांनी सिची चौक पोलिस ठाण्यातील पोलीस अधिकारी शिनगारे यांना कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार त्यांनी मतीनविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सिटी चौक पोलिस तपास करत आहेत.