Maharashtra

औरंगाबादेत सरकार विरोधात अर्धनग्न आंदोलन

By PCB Author

September 25, 2019

औरंगाबाद, दि. २५ (पीसीबी) –  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भाजप सरकारने शिखर बँकेच्या माध्यमातून गुन्हा दाखल केला आहे . यांच्याविरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस औरंगाबाद युवक शहर व जिल्हा काँग्रेसतर्फे औरंगाबादेत सरकार विरोधात अर्धनग्न आंदोलन करण्यात आले.

या टरबूजा सरकारचा करायचं काय ‘ भाजप सरकार हाय हाय यासह विविध घोषणा आंदोलनकर्त्या युवकांनी दिल्या. खोटा गुन्हा दाखल करून शरद पवारांना बदनाम करण्याचे हे सरकारचे षड्यंत्र आहे. म्हणून पंतप्रधान व मुख्यमंत्री याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. औरंगाबाद येथील क्रांती चौकात हे आंदोलन करण्यात आले.

आगळ्यावेगळ्या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधले होते. सरकारने शरद पवार यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्याचे पडसाद आता शहरात सर्व ठिकाणी उमटायला लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शहर आणि जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आले.