Maharashtra

औरंगाबादमध्ये शिवजयंतीच्या मिरवणूकीत घुसून तरूणाची हत्या

By PCB Author

February 20, 2020

औरंगाबाद , दि.२० (पीसीबी) – छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती बुधवारी राज्यात मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली. गावखेड्यात आणि शहरांत महाराजांची भव्या मिरवणूकीही काढण्यात आल्या. शिवजयंतीच्या मिरवणूकीत घुसून एका तरूणाची औरंगाबादमध्ये हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे .

श्रीकांत गोपीचंद शिंदे ( वय २० , रा. गारखेडा) अ से त्या तरूणा चे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीकांत गोपीचंद शिंदेचं सध्या बी.ए. चे शिक्षण सुरू आहे. बुधवारी, १९ फेब्रुवारी रोजी मित्रांसोबत तो मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी घरातून बाहेर पडला होता. हनुमाननगरकडून पुंडलिकनगर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडे जाणाऱ्या मिरवणूकीत तो सहभागी झाला होता. सुत्रांच्या माहितीनुसार, श्रीकांतचे काही अनोळखी तरूणांसोबत जोरदार भांडण झाले होते. भांडणानंतर श्रीकांत मिरवणूकीत सहभागी झाला होता. डीजेच्या तालावर इतर तरूणांसोबत श्रीकांतने ताल धरला. त्याचवेळी आरोपीने चाकू श्रीकांतच्या छातीत खुपसला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे श्रीकांत जमीनीवर कोसळला. आरोपींनी तात्काळ घटनास्थळावरून पळ काढला. आरोपींना पकडण्यासाठी चार पथके नेमण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास पुंडलिकनगर पोलिस करत आहेत.