औरंगाबादमध्ये अभिनेत्री जरीन खान यांना पाहण्यासाठी तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी

0
1121

औरंगाबाद, दि. १४ (पीसीबी) – एका मोबाईल शॉपीच्या उद्घाटनासाठी आज (शुक्रवार) औरंगाबाद येथील कॅनोट प्लेस येथे आलेल्या सिने अभिनेत्री जरीन खान यांना पाहण्यासाठी आलेल्या तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यावेळी काही टोळक्यांनी परिसरात उभ्या असलेल्या काही वाहनांची देखील तोडफोड केली.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी औरंगाबाद कॅनोट प्लेस येथील मोबाईल शॉपीच्या उद्घाटनासाठी सिने अभिनेत्री जरीन खान आल्या होत्या. यावेळी शॉपीच्या मालकाने कुठलाही पोलीस बंदोबस्त न घेता खाजगी बाउन्सर लावले होते. चाहत्यांची गर्दी अचानक वाढल्याने बाउन्सर आणि लोकांमध्ये बाचाबाची सुरु होऊन हाणामारी सुरु झाली. यावादात दोन गट एकमेकांना भिडले आणि यावादाचे रुपांतर मोठ्या हाणामारीत झाले. . यावेळी काही टोळक्यांनी परिसरात उभ्या असलेल्या काही वाहनांची देखील तोडफोड केली. यात अभिनेत्री जरीन सुद्धा मागे राहिली नाही, तिनेही एका चाहत्याच्या कानशिलात वाजवली. त्यामुळे अभिनेत्री जरीन खान हिला तब्बल दोन तास शोरूम मधेच अडकून पडावे लागले.