औरंगाबादमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विवाहीत तरुणाची रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या

0
581

औरंगाबाद, दि. ३० (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एका विवाहीत तरुणाने फेसबुकवर पोस्ट टाकून रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना रविवारी (दि.२९) रात्रीच्या सुमारास औरंगाबाद येथील मुकुंदवाडीतून उघडकीस आली.

प्रमोद होरे पाटील (वय २८, रा. औरंगाबाद, मुकुंदवाडी) असे  आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारपासून प्रमोद गायब होता. सायंकाळी त्याच्या मित्र-मैत्रिणींनी फेसबुकवर त्याची पोस्ट पाहिली. त्यात तो मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन परिसरात रेल्वे रुळाजवळ उभा असून फोटोवर ‘मराठा आरक्षण जीव जाणार’ असे कॅप्शन लिहिले होते. हे कॅप्शन आणि रेल्वेरुळावरील त्याचा फोटो पाहिल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी आणि मित्रपरिवाराने त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली असता रात्री त्याने मुकुंदवाडी रेल्वेस्थानकात रेल्वेखाली उडी मारून जीव दिल्याचे उघड झाले. प्रमोद विवाहित असून त्याला दोन मुलेही आहेत. त्याने दोनवेळेस ग्रामसेवक पदासाठी परीक्षाही दिली होती.