“…मग तुम्हाला मुख्यमंत्रीऐवजी सरपंच केलं असत तर?”

0
224

सिंधुदुर्ग, दि.०७ (पीसीबी) : “आम्ही औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करा अशी मागणी केली होती. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केवळ विमानतळाला संभाजी महाराजांचं नाव दिलं. जर तसं असेल तर मग तुम्हाला मुख्यमंत्री न बनावता सरपंच केलं असतं तर चाललं असतं का? मर्द असाल तर वडिलांचं स्वप्न पूर्ण करा, अन्यथा काय ते सर्टिफिकेट आम्ही देऊ”, अशी बोचरी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली आहे.

पुढे राणे असंही म्हणाले कि, “विरोध कुठे आणि कशासाठो होतोय हे महत्त्वाचं आहे. विरोध करणाऱ्यांना शेतकऱ्यांचं हित साधायचं आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कोकणातील शेतकरी कृषी कायद्याचं स्वागत करत आहेत. या रॅलीमध्ये लोकांना बोलवावं लागत नाही. काँग्रेसने 2019 च्या जाहीरनाम्यात याचा उल्लेख केला. काँग्रेस बोलत राहिले पण पंतप्रधान मोदींनी करुन दाखवलं, असं न चुकता नितेश राणे यांनी सांगितलं.

दरम्यान शेतकरी संघटना आतून या कायद्याला समर्थन देत आहेत. राज्यात या कायद्याबाबतीत राष्ट्रवादीची भूमिका काय? शिवसेनेला कायदे कळले तरी आहेत का? काँग्रेसला फक्त विरोध करायचा आहे. राहुल गांधी वायनाडमधून निवडून येऊ शकतात मग कोकणातील शेतकरी बाहेर माल का विकू शकत नाही? असे सवाल नितेश राणेंनी उपस्थित केले.