पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – औद्योगिकनगरीत बुधवार (दि.२०) हा दिवस घातवार ठरला. शहरात एकाच दिवसात वेगवेगळ्या घटनामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला. अपघातात ५ जणांना आपला जीव गमवावा लागला. तर आत्महत्या करून ३ जणांनी आपली जीवनयात्रा संपवली. तर खून प्रकरणात एकाचा मृत्यू झाला. शहरातील वाढती लोकसंख्या, ताणतणाव, स्त्री अत्याचार आणि बेशिस्त वाहतूक या बाबी मृत्यूच्या घटनांना कारणीभूत ठरल्याचे अधोरेखित झाले आहे.