Pune

औंध येथील रोहित जुनवणे हत्या प्रकरणी तिघांना अटक

By PCB Author

November 02, 2018

औंध, दि. २ (पीसीबी) – औंधमधील कस्तुरबा वसाहतीत गुरुवारी पहाटे साडेपाच्या सुमारास शिवसेना उपविभाग प्रमुख रोहित जुनवणे याचा धारदार कोयत्याने वार करुन खून करण्यात आला होता. या खूनाचा छडा लावण्यासाठी जलद गतीने तपास चक्र फिरवत गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने तिघा आरोपींना अटक केली आहे.

प्रतीक सुनील कदम (वय १९), अमोल महादेव चोरमले (वय २८, दोघे रा. कस्तुरबा वसाहत औंध) आणि आकाश आनंदा केदारी (वय २६, रा. आंबेडकरनगर औंध) असे अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे साडेपाच्या सुमारास शिवसेना उपविभाग प्रमुख रोहित जुनवणे याचा धारदार कोयत्याने वार करुन खून करण्यात आला होता. या खूनाचा छडा लावण्यासाठी जलद गतीने तपास चक्र फिरवत गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने प्रतीक, अमोल आणि आकाश या तिघा आरोपींना हडपसर येथील ग्लायडिंग सेंटर येथून अटक केली. प्राथमिक माहितीनुसार रोहित याने बेकायदा बांधकामांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला होता त्यातूनच त्याची हत्या करण्यात आल्याचे बोलले जात आहे. गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस अधिक तपास करत आहेत.