औंधमध्ये भारतीय लष्कर करणार पाच देशांच्या सैन्यदलांसोबत लष्करी सराव

0
678

पुणे,  दि. ७ (पीसीबी) – परदेशातील सैन्यांसोबत सौहार्दपूर्ण वातावरण राहावे म्हणून भारतीय लष्करातील सदर्न कमांड हे भूतान, श्रीलंका, बाग्लांदेश, थायलंड, नेपाळ या पाच देशाच्या सैन्यदलांसोबत लष्करी सराव करणार आहे. १० ते १६ सप्टेंबरदरम्यान  औंधमधील लष्करी तळावर हा लष्करी सराव होणार असल्याची माहिती सदर्न कमांड प्रमुख डी.आर. सोनी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

याआधी अशा पध्दतीचा लष्करी सराव बांग्लादेश, भूतान, म्यानमार येथे झाला होता. आता हा लष्करी सराव पुण्यातील औंध जवळील लष्करी तळावर होणार आहे. पुणे हे एक सदर्न कमांडचे मुख्य स्थळ आहे. येथील वातावरण अशा सरावासाठी पोषक आहे. पूर्वी भारत-चीन सैन्यदलाचा संयुक्त सराव येथे झाला होता. यामुळेच लष्करी सराव पुण्यात घेण्यात येणार आहे. सरावात प्रत्येक देशातील २५ जवान येणार आहेत. दहशतवादी ज्या पध्दतीने हल्ले करतात त्याला प्रतिउत्तर कसे द्यायचे या संदर्भात हा लष्करी सराव होणार आहे.