Chinchwad

औंधमध्ये तरुणाची गळफास घेत आत्महत्या

By PCB Author

May 17, 2019

औंध, दि. १७ (पीसीबी) – एका १९ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना आज (शुक्रवार) पहाटेच्या सुमारास औंध डीपी रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीतून समोर आली.

अतुल रामलींग शिंदे (वय १९, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, औंध) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी औंध पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री अतुल हा घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीत एकटा झोपायला गेला होता. मात्र, त्याने गळफास घेत आत्महत्या केल्याचे आज पहाटे समोर आले. अतुलने आत्महत्या का केली हे अद्याप समजू शकले नाही. औंध पोलीस तपास करत आहेत.