Maharashtra

ओरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयासमोर पंकजा मुंडे लाक्षणिक उपोषण करणार

By PCB Author

January 23, 2020

ओरंगाबाद , दि.२३ (पीसीबी) – कायम दुष्काळाशी सामना करत असलेल्या मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्याच्या प्रश्नासाठी भाजपाच्यावतीनं माजी मंत्री पंकजा मुंडे उपोषण करणार आहेत. सोमवारी , २७ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता ओरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयासमोर पंकजा मुंडे लाक्षणिक उपोषण करणार असल्याची माहिती भाजपा प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांनी गुरुवारी दिली.