Desh

ओमिक्रॉन व्हेरिएंट इफेक्ट, पुन्हा वर्क फ्रॉम होम पॉलिसी

By PCB Author

December 03, 2021

नवी दिल्ली, दि. ३ (पीसीबी) – जगभरात झपाट्याने पसरणाऱ्या करोना व्हायरसच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे गुगलने १० जानेवारी २०२२ पासून ऑफिस-टू-ऑफिस योजना अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली आहे. अल्फाबेट इंकची कंपनी गुगलने गुरुवारी सांगितले की, करोनाच्या ओमिक्रॉन प्रकारामुळे जागतिक स्तरावर धोका वाढला आहे. अशा परिस्थितीत, कंपनी सक्तीच्या लसीकरणाच्या नियमांनुसार काही काळासाठी वर्क फ्रॉम होम मोडवर काम करेल.

गुगलने ऑगस्टमध्ये सांगितले होते की नवीन वर्षात १० जानेवारीपासून आठवड्यातून किमान तीन दिवस ऑफिसमधून काम करणार आहोत. त्यानंतर वर्क फ्रॉम होम पॉलिसी संपेल. गुरुवारी गुगलच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले की, सध्याची परिस्थिती पाहता ऑफिस टू रिटर्न प्लॅन लागू केला जाणार नाही. पुढील परिस्थिती पाहूनच कार्यालयात परतण्याच्या योजनेबाबत निर्णय घेतला जाईल.