Maharashtra

ओमराजे निंबाळकरांवर हल्ला करणारा भाजपचा पदाधिकारी नाही

By PCB Author

October 18, 2019

उस्मानाबाद, दि. १८ (पीसीबी) – उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर हल्ला करणारा  अजिंक्य टेकाळे हा भाजपचा कोणताही पदाधिकारी नाही. तो आयटी सेलचा तालुकाध्यक्ष असल्याचे वृत्त खोट आहे. तर तो शंभो प्रतिष्ठानचा पदाधिकारी आहे, असे स्पष्टीकरण भाजपने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिले आहे.

अजिंक्य टेकाळे हा भाजपचा कार्यकर्ता असून तो आयटी सेलचा तालुकाध्यक्ष आहे,  अशा बातम्या  प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यामुळे या प्रकरणाला नवीन वळण मिळाले होते. परंतु यावरून आता भाजपकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर महायुतीच्या  उमेदवारांच्या प्रचारासाठी कळंब तालुक्यात नायगाव पाडोळी येथे आले होते. यावेळी सभा सुरु असताना एका तरुणाने त्यांच्यावर चाकू हल्ला केला . हल्ला करणाऱ्या तरुणाचे नाव हे अजिंक्य टेकाळे असून तो भाजपचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले जात होते. टेकाळे याला पोलिसांनी अटक केली आहे.